दहावी-बारावीतील गुणवंतांचा मातोश्री फौंडेशनतर्फे गौरव

0

फैजपूर- मातोश्री फौंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रविवारी करण्यात आला. प.पू.जनार्दन स्वामीजी यांच्या हस्ते वृक्षारोपणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना सम्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र, वह्या, पेन, पुष्पगुच्छ देऊन महाराजांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. फैजपूर, पिंपरूड, आमोदा, न्हावी, रोझोदा व चिनावल या गावातील शाळांच्या विद्यार्थ्याचा कार्यक्रमात गौरव करण्यात आला. गांधी विचार संस्कार परीक्षातर्फे 2017 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेच्या यशस्वी आयोजनाबद्दल ज्ञानज्योती वाचनालय व ग्रंथालय पिंपरूडच्या ग्रंथपाल स्वाती राहुल कोल्हे यांना गांधी विचार संस्कार परीक्षा, जळगाव यांच्यातर्फे ग्रंथालयाला सम्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या परीक्षेत रोहिणी तुकाराम कोळी हिचा जिल्ह्यात तिसरा क्रमांक आल्याबद्दल सम्मान पदक व प्रमाण पत्र प्रदान करण्यात आले.

पालक व गुरूजणांचा आदर राखा
या प्रसंगी प.पू.जनार्दन स्वामीजी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अशाच पद्धत्तीने यशाची शिखरे पादाक्रांत करावी तसेच पालक व गुरूजणांचा नेहचा आदर राखावा. प्रसंगी 200 विद्यार्थ्याना वह्या, पेनचे वाटप करण्यात करण्यात आले. मातोश्री फौंडेशनचे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी प्रस्ताविक केले. व्यासपीठावर जिल्हा परीषद शाळा पिंपरूडचे मुख्याध्यापक सलीम तडवी, प्रा.डॉ.जी.जी.कोल्हे, प्रा.ए.के.जावळे, प्रा.पी.एस.बोरोले, मुख्याध्यापक गणेश गुरव उपस्थित होते. धनराज श्रावण कोळी हे म.सा.का. कारखान्याच्या सेवेतून सेवानिवृत्त झत्तल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी राहुल कोल्हे, चंद्रकांत जंगले यांनी परीश्रम घेतले. सूत्र संचालन प्रा.राजेंद्र राजपूत यांनी केले.