दहा हजारांची लाच घेतांना रावेरात उपनिरीक्षक जाळ्यात

0
भुसावळ : मार्बलचा ट्रक सोडण्यासाठी दहा हजारांची लाच घेणार्‍या रावेर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण एकनाथ निकाळजे यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी चार वाजेच्या सुमारास रंगेहाथ अटक केली. तक्रारदार यांचा ट्रक 5 रोजी रावेर शहरातील आंबेडकर चौकात निकाळजे यांनी थांबवून दहा हजार लाचेची मागणी केली. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.