दहिगावच्या इसमाविरुद्ध अखेर यावल पोलिसात गुन्हा

0

यावल- महापुरूषांच्या फलकावर लावलेली विद्युत रोशनाईची लायटींग तोडून धार्मिक भावना दुखावल्याची घटना शनिवारी घडली होती. याबाबत यावल पोलिसांकडे संतप्त जमावाने कारवाईची मागणी केल्यानंतर संशयीताविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अजय बाळू अडकमोल यांच्या फिर्यादीनुसार आलीम तुराब पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 13 एप्रिल रोजी गावातील ग्रामपंचायत व्यापारी संकुलाजवळ महापुरूषाची प्रतिमा लावण्यात आल्यानंतर त्यावर विद्युत रोशनाई करण्यात आली मात्रमध्यरात्री 12 वाजेला संशयीत आरोपीने लायटींग तोडत धार्मिक भावना दुखावल्या. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.