दहिगावच्या तरुणाची गळफास घेत आत्महत्या

यावल : तालुक्यातील दहिगाव येथील एका 32 वर्षीय विवाहित तरूणाने बकरी ईदच्या पुर्व संध्येला आत्महत्या केली. शरीफ तुराब पटेल असे मयताचे नाव आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

दहिगावात तरुणाच्या मृत्यूने हळहळ
दहिगाव शिवाजी चौकात शरीफ तुराब पटेल (32) हा कुटुंबासह वास्तव्यास असून शनिवारी त्याचे पत्नी सोबत भांडण झाले होते व या कारणावरून त्यांची पत्नी माहेरी हनुमंतखेडा, ता.धरणगाव येथे निघुन गेली व सोबत मुलींना देखील घेवुन गेली. शरीफ पटेल हा सांयकाळी घरी आला तेव्हा पत्नी दिसली नाही म्हणून संतापाच्या भरात त्याने आत्महत्या केली. हा प्रकार शेजारील रहिवासी यांच्या निर्दशनास आला व त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली व मयत शरीफ यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी करीता यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. येथे डॉ.सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह कुटुंबीयास सोपवला. मयताच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परीवार आहे. या प्रकरणी करीम तुराब पटेल यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार संजय देवरे करीत आहे.