दहिगावच्या विवाहितेचा छळ : तांदलवाडीच्या पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा

यावल : तालुक्यातील दहिगाव येथील माहेर असलेल्या 26 वर्षीय विवाहितेचा पैसे न आणल्याने छळ करण्यात आला. या प्रकरणी तांदलवाडी (ता.रावेर) येथील पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
कांचन भूषण जंजाळकर यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह तांदलवाडी येथील रहिवासी भूषण जगनाथ जंजाळकर यांच्याशी 2019 मध्ये झाला. लग्नाच्या एक महिन्यानंतर भूषणने पैशांची मागणी व पैसे न दिल्याने शिवीगाळ, मारहाण सुरू केली. सासू, सासरे, ननंद, चुलत सासरे, चुलत सासू यांनी देखील गांजपाठ केला. पैशांची मागणी पूर्ण न झाल्याने कांचन माहेरी निघून आल्या. यानंतर 25 फेब्रुवारीला तक्रार दिल्यानंतर पती भूषण जंजाळकर, सासू लिलाबाई जंजाळकर, सासरे जगन्नाथ जंजाळकर, नणंद संगीता जाधव, नणंद सुवर्णा रूल्हे, चुलत सासरे सदाशीव जंजाळकर, चुलत सासू मंगलाबाई जंजाळकर, सोपान जंजाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.