दहिगावात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

0
यावल:- तालुक्यातील दहिगाव येथील 26 वर्षीय तरुणाने शुक्रवारी दुपारी सोलेशन प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. अत्यवस्थ अवस्थेत त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले असून तयाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले. भालचंद्र श्रीराम पाटील असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या तरुणाचे नाव आहे. यावल ग्रामीण रुग्णालयात भालचंद्र पाटील यांच्यावर डॉ.कमलेश पाटील, गुलाम अहेमद शेख यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.