दहिवद ग्रामपंचायतमधील दप्तर गहाळाचे आरोप बिनबुडाचे

0

अमळनेर । तालुक्यातील दहिवद ग्रामपंचायतीतील विविध विकास कामांच्या लेखाजोखा असलेले दप्तर गहाळ झाल्याची तक्रार ग्रामस्थ शामकांत पाटील यांनी केले आहे. मात्र हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे कागदपत्रासहीत स्पष्टीकरण ग्रामविस्तार अधिकारी संजीय सैदाने यांनी दिले आहे. हे सर्व आरोप दहिवद येथील श्यामकांत पाटील यांचे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत असे ग्रामविस्तार अधिकारी संजीव सैदाणे यांनी कागदपत्राद्वारे दिली. ग्रामविस्ताराधिकारी संजीव सैंदाणे एप्रिल 2013 मध्ये दहिवद येथे रुजू झाले. परंतु त्यांना कार्यभार मिळालेला नव्हता. त्यांना तात्पुरता ग्रामनिधी व पानी पुरवठेचा अपूर्ण कार्यभार मिळालेला होता. त्याच वेळेस 4 मे रोजी संबंधीत ग्रामसेवकाला निलंबीत करण्यात आले होते. संबंधीत ग्रामविस्तार अधिकार्‍याने लिपीकाकडून कार्यभार हस्तांतरण करुन कागदपत्र सोबत नेले. मात्र नेलेले कागदपत्र परत केले नाही.

कारवाई विरोधात कोर्टात धाव
त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडून ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 179/1/2/3 प्रमाणे चौकशी करुन कारवाई करण्यात आली होती. कारवाई विरोधात सैदाणे यांनी संयम पाटील यांचा हायकोर्टात धाव घेतली. हाय कोर्टाने हे आरोप निरर्थक असल्याचा निकाल दिला आहे. तत्पूर्वी ग्रामविस्तार अधिकारी संजीव सैंदाणे वैद्यकीय रजेवर गेले होते. त्यानंतर कैलास रामभाऊ देसले यांनी कार्यभार स्विकारला. सर्व कागदपत्राची तपासणी करुन त्यांच्याकडे कार्यभार देण्यात आलेला होता. तसे दप्तरी यादीत नमूद आहे. पाणी पुरवठा योजना हे काम पुर्वीपासून चालू होते. दहिवद ग्रामपंचायत दप्तर गहाळ प्रकरणी आरोप बिनबुडाचे आहेत यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही सदर आरोप करुन हे माझी प्रतिमा डागव्याचा हा कुटील डाव असल्याचे संजीय सैदाणे यांनी सांगितले.