दहिवद माध्यमिक विद्यालयाचे अखेर कुलूप उघडले

0

चाळीसगाव- तालुक्यातील दहिवद जि.प.शाळेचे कुलूप अखेर संचालक मंडळ व ग्रामस्थांच्या चर्चेअंती उघडण्यात आले आहे तर मुख्याध्यापक ईश्वरलाल अहिरे याना संचालक मंडळाने तूर्तास गणेशपूर येथे हजर राहण्यास सांगितले असलेतरी अहिरे यांनी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे. निकाल येईपर्यंत अहिरे यांनी दहिवद येथेच हजर रहावे, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. सरपच भीमराव पवार, अरुण निकम, बाळासाहेब चव्हाण, संजय देशमुख, अशोक पाटील , अशोक खलाणे, बी..वाय चव्हाण, ईश्वर अहिरे, उपसरपंच भीमराव खलाणे आदींची उपस्थिती होती.