दहिवद येथील रस्त्याच्या नोंदीची चौकशी करण्याची मागणी

0

अमळनेर । तालुक्यातील दहिवद येथे शेतात जाणारा रस्त्यावर दगड मुरूम टाकून पाणी अडविण्यासाठी तयार करण्यात आलेला बंधारा काढून टाकण्यात येऊन चौकशी करावी व तसे न झाल्यास आत्महत्या करण्याचा लेखी इशारा शेतकरी भीमराव सोमा गोसावी, युवराज सोमा गोसावी, कैलास सोमा गोसावी व विमलबाई नामदेव गोसावी यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिला आहे.

नाल्याच्या मधोमध दगड मुरूम टाकून केला बंद
दहिवदकडून पातोंडा गावाकडे जाणार्‍या बैलगाडीचा रस्ता हा नाल्यातून जातो व पुढे गट न 640 पासून उत्तर दिशेला बैलगाडीचा रस्ता आहे. नाल्याचा प्रवाह नकाशात गट नं. 640/1 व 640/2 ह्या शेतात दाखविला आहे व आगोदर पासून तसाच होता. मात्र त्यांनी आता तो रस्ता खोदून पाण्याचा प्रवाह मोकळा केलेला असून पाणी रस्त्याने वाहत होते. परंतु आता गट नं. 632 चे शेतमालक जनाबाई शिवाजी पाटील यांनी रस्ता व नाल्याच्या मधोमध दगड मुरूम टाकून आडवा बंधारा बांधून ते काम जलयुक्त शिवारचे दाखविले मात्र पावसाळ्यात जर पाऊस जास्त पडल्यास नाल्यावरच पाणी आडविल्यामुळे पाणी गट नं. 638/1 व 638/2 यांच्या शेतात पाणी जावून शेती पूर्णतः वाहून जाईल यासंदर्भात आपणाकडे वारंवार लेखी अर्ज केलेले आहेत.

शेतीशिवाय इतर पर्याय नाही
काम सुरु असतांना काम बंद करण्यासाठी अर्ज केलेला असतांना देखील शेतमालकांनी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोलीकरण केलेला आहे. याबाबत कोणतीही चौकशी प्रशासनाने केली नाही. आता पावसाचे आगमन होईल त्यामुळे शेताच्या होणार्‍या नुकसानास प्रशासन जबाबदार राहील. बंधार्‍यामुळे संपूर्ण शेत वाहून जाणार आहे. परिवार शेतीच्या उत्पन्नावर अवलंबुन असल्यामुळे शेती वाहून गेल्यास उपजीविकेचा प्रश्न उभा राहिल. भीमराव गोसावी, युवराज गोसावी, कैलास गोसावी व विमलबाई नामदेव गोसावी यांनी लेखी निवेदन प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिला आहे