दहिसरमध्ये स्वच्छता अभियान, 600 स्वयंसेवकांचा सहभाग

0

मुंबई । वर्ल्ड मिशन सोसायटी ऑफ चर्च ऑफ गॉड या संस्थेतर्फे ‘मदर स्ट्रीट’ या प्रभाग क्रमांक 1 येथील नुकत्याच राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहीम अभियानाला सुमारे 600 स्वयंसेवक, पर्यावरणप्रेमी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी व शिवसेना उपनेते डॉ. विनोद घोसाळकर यांच्या हस्ते झाले. दहिसर पश्‍चिम येथील कांदरपाडा येथील विश्‍व प्रगती मंडळ मैदानातून उपक्रमाची सुरुवात आली, तर सांगता बोरिवली पश्‍चिम येथील आयसी कॉलनी येथील मदर तेरेसा मैदानात झाली. विनोद घोसाळकर, स्थानिक नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर, मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांच्या संकल्पनेतून वर्ल्ड मिशन सोसायटी ऑफ चर्च ऑफ गॉड या संस्थेतर्फे ‘मदर स्ट्रीट’ हा भव्य उपक्रम राबवण्यात आला.

संस्थेतर्फे विविध उपक्रम
विशेष म्हणजे संस्थेच्या वतीने एकाच वेळी तब्बल 175 देशात 48हजार किलोमीटर क्षेत्रात ही भव्य स्वच्छता मोहीम राबवली गेली. संस्थेच्या या उपक्रमाचे स्वागत अमेरिका, ब्रिटन, कोरिया आदी देशांनी विविध पुरस्कार दिले आहेत. स्वच्छतेबरोबरच संस्थेतर्फे रक्तदानासारखे विविध उपक्रम राबविले जातात. स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पालिकेने स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन खासदार गोपाळ शेट्टी यांनी या वेळी केले. तर घोसाळकर यांनी कचरा हे मोठे आव्हान पेलण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यासठी इतर संस्थांनी व नागरिकांनी पुढाकार घेतल्यास मुंबईतील रोज जमा होणारा 6500 मेट्रिक टन कचरा कमी होण्यास मदत होईल, असा विश्‍वास व्यक्त केला.