नगरसेवक प्रविण भालेकर युवा मंचचा उपक्रम
रुपीनगर : येथील नगरसेवक प्रविण भालेकर युवा मंच यांनी ‘नवरात्रोत्सव 2018’ अंतर्गत रास दांडिया स्पर्धेचे आयोजन केले होते. नऊ दिवस सुरु असलेल्या नवरात्रोत्सवामध्ये रोज आकर्षक वेषभूषा, आकर्षक दांडिया, गरबा खेळणार्या हौशी महिला, पुरुष तसेच लहान मुलांना विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली. महिलांसाठी रोज प्रश्नमंजुषा लकी ड्रॉचे आयोजन करून विजेत्या महिलांना आकर्षक बक्षीसे देण्यात आली. विजयादशमीचे औचित्य साधून परिसरातील सुमारे 150 जेष्ठ नागरिकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच 500 शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
अभिनेत्री ईशा केसकर आकर्षण
स्पर्धेत सहभागी खेळाडूंची अंतिम फेरी व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम कोजागिरी पौर्णिमेला पार पडला. यावेळी जय मल्हार व माझ्या नवर्याची बायको मालिकेतील अभिनेत्री ईशा केसकर विशेष आकर्षण ठरली. या अभिनेत्री ला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. विजेत्यांना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघीरे, नगरसेवक प्रवीण भालेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघिरे, नगरसेवक पंकज भालेकर, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रवीण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित महिला संकल्प उद्देश डोळ्यासमोर ठेऊन दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. प्रविण भालेकर युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.
विजेते पुढीलप्रमाणे
बक्षिस वितरण-लहान गट-प्रथम : सिद्धी मळेकर (सायकल), शिवानी मुटके (सायकल). मोठा गट-प्रथम-संस्कृती जाधव (सायकल),
संदिप लवांडे (सायकल). खुला गट- प्रथम- महिलांमधून संगीता नागरगोजे (स्मार्ट टीव्ही) व पुरूष गटातून त्रिलोक राजपूत (वाशिंग मशीन). द्वितीय क्रमांक-प्रतिक्षा तुपे (सोन्याची नथ), तृतीय क्रमांक-छाया म्हामुलकर (घड्याळ) तसेच दैनंदिन बक्षिसांसह 120 आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले.