दांडी बहाद्दर बीडीओंना कारणे दाखवा नोटीस

0

आढावा बैठकीत आमदार हरीभाऊ जवळेंचा संताप

फैजपूर– यावलसह रावेर तालुक्यातील आढावा बैठकीस शुक्रवारी गटविकास अधिकार्‍यांनी दांडी मारल्याने आमदार हरीभाऊ जावळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात बैठक झाली. सर्व विभागातील बीडीओ हजर राहणे अपेक्षित असताना त्यांचे प्रतिनिधी हजर असल्याने आमदा र जावळे संतप्त झाले. प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबाले यांना सर्व बीडीओंना नोटीसा काढण्याचे आदेश दिले. बैठकीत सर्व जिल्हा परीषद शाळा स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले, हिंदुस्थान पेट्रोलियम सीएसआर फंड मधून 98 जिल्हा परीषद शाळांमध्ये मार्च पर्यंत शौचालयाचे बांधकाम करणे गरजेचे व उर्वरीत 100 शौचालय नंतर बांधण्यात येतील तसेच यावल तालुक्यातील कृषी विभागात एकूण 37 पदे मंजूर असून 10 पदे रिक्त असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावर आमदार जावळे यांनी लागलीच मंत्रालयात बोलून पदे लवकर भरू, असे आश्‍वासन प्रसंगी दिली.