दांडी मारून विवाह सोहळ्यास गेलेल्या पोलिसांवर कारवाई होणार

0

ठाणे । अंडरवर्ल्ड डॉन आणि फरारी आरोपी दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांच्या लग्नाला बड्या पोलीस अधिकार्‍यांनी हजेरी लावल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. त्यावर विविध प्रकारचा काथ्याकूट झाल्यानंतर ठाण्यात पोलीस महासंचालकांनी मात्र पोलीस अधिकारी ड्युटीवर दांडी मारून गेले असल्यास त्या पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी ठाण्यात दिली.

तर दुसरीकडे फेरीवाले आणि रिक्षाचालकांना बाळाचा वापर करून करण्यात आलेल्या मारहाणीबाबत बोलताना पालिका आयुक्त यांनी अतिरेक केला असल्यास चौकशी करून पुरावे तपासून त्यांच्यावरही कारवाई करण्याचे संकेत माथूर यांनी दिले. पुणे पोलीस दलात नव्या गाड्यांचा समावेश करण्यात येणार होता. या कार्यक्रमाला पोलीस महासंचालक सतीश माथूर उपस्थित होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर माथूर यांनी नाशिक मधील दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात पोलीस अधिकारी गेल्याचा आवाहल आपणाकडे आला आहे. मात्र, जर पोलीस अधिकारी ड्युटीला बगल देऊन गैरहजर राहून लग्नास गेले असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

मात्र, अद्यापपर्यंत याप्रकरणी आपण कारवाईचे आदेश देण्यात आले नसल्याचेही स्पष्टीकरण माथूर यांनी ठाण्यात दिले. दुसरीकडे सध्या ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी फेरीवाला आणि रिक्षाचालक याना केलेल्या मारहाणीच्या चित्रफिती आणि तक्रारी वाढत असून, त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. याबाबत पोलीस महासंचालक सतीश माथूर यांना विचारले असता त्यांनी सांगितले. सादर मारहाणीच्या तक्रारी, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदने आपल्याकडे आली आहेत. दरम्यान पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कारवाईसाठी अतिरिक्त फोर्स वापरला आहे काय? त्यांनी कारवाई दरम्यान अतिरेक केला आहे काय? याबाबत चौकशी करून पुरावे तपासण्यात येणार आहेत. जर त्यांची कारवाई कायद्याच्या चौकटीत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूतोवाच पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी ठाण्यात केले.