दांडेकर नगरातून मजुराची चोरट्यांनी दुचाकी लांबवली

Thieves Stole A Laborer’s bike From Dandekar Town जळगाव : शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम असून दररोजच्या चोर्‍यांमुळे वाहनधारक धास्तावले आहेत. पिंप्राळा शिवारातील दांडेकर नगरातून मजूराची दुचाकी चोरीला गेली. सोमवार, 5 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घरासमोरून लांबवली दुचाकी सुरेश ओंकार पाटील (49) हे आपल्या परीवारासह दांडेकर नगर, पिंप्राळा येथे वास्तव्यास असून ते मजुरी करतात. त्यांनी 30 ऑगस्ट रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर त्यांनी दुचाकी (एम.एच.19 सी.टी.2437) पार्किंगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबवली. सोमवार, 5 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक प्रवीण जगदाळे करीत आहे.