पोलिसांत तक्रार दाखल
नवी दिल्ली : मदरशांमधून दहशतवादी निर्माण होत असल्याचे वक्तव्य करणारे शिया मध्यवर्ती बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने धमकी दिली आहे. मौलानांची माफी मागा अन्यथा परिणामांना सामोरे जा, अशी धमकी दाऊदने दिल्याचे रिजवी यांनी म्हटले आहे. त्यांनी यासंबंधीची तक्रार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
शिक्षणप्रणालीविरोधात मोदींना पत्र
शनिवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने दाऊदचा साथीदार असल्याचे सांगत भाईच्या नावाने धमकी दिल्याचे रिजवी यांनी तक्रारीत म्हटले आहे. रिजवी यांनी मदरशांमधील शिक्षणप्रणालीविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तक्रार केली होती. त्यानंतर जमात-ए-उलेमा-ए-हिंदने रिजवी यांच्याविरोधात 20 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. तसेच याप्रकरणी रिजवी यांनी माफी मागावी, अशी मागणीही जमात-ए-उलेमाने केली होती.