दाऊदच्या फायनान्स मॅनेजरला लंडनमध्ये अटक

0

लंडन: दाऊद इब्राहीमला जोरदार दणका बसला आहे. दाऊदचा अत्यंत निकटचा सहकारी जबीर मोती याला लंडमध्ये अटक करण्यात आली आहे. लंडनच्या चारिंग क्रॉस पोलिसांनी हिल्टन हॉटेलमधू त्याला अटक केली.

जबीर मोतीकडे पाकिस्तानचे नागरिकत्व असून, तो, दाऊदचा अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखला जातो. मोती हा दाऊदचे इग्लंड, यूएई आणि इतर देशातील व्यवहार सांभाळत असे. दाऊदची पत्नी महजबीसुद्धा जबीरवर विश्वास ठेवत असे. माहितीनुसार, दाऊद कराची येथील क्लिप्टन परिसरात राहतो. मोती याच्यावर अंमली पदार्थांची तस्करी, खंडणी आणि इतर काही गुन्ह्यांचे आरोप आहेत. त्याला अटक करावी अशी अपील भारताकडून करण्यात आली होती.

दाऊदसाठी मोती बनावट भारतीय चलनाची निर्मिती करत असे. तसेच, तो अवैधरित्या शस्त्रपूरवठा, संपत्ती, व्यवसाय आदी गोष्टींची जबाबदारीही सांभाळत असे. मोतीच्या नावे कराचीत मोठी मालमत्ताही आहे.