चाळीसगाव – येथील वार्ड क्रमांक 14 च्या नगरसेविका बेग यास्मीनबी फकीरा यांच्या पती विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल झालेला गुन्हा हा खोटा असुन त्याची चौकशी करुन पुढील कारवाई व्हावी व त्यांचे नाव गुन्ह्यातुन वगळण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा ईशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यासंदर्भात नगरसेविका यास्मीनबी फकीरा बेग मिर्झा यांनी पत्रकार परीषदेत दिली. 12 सप्टेंबर रोजी त्यांंनी निवेदन दिले असुन त्यात त्यांचे पती सामाजीक कार्यकर्ते असून ते सामाजिक कार्यात सक्रीय असल्याने काही समाजकंटकांना त्यांची प्रगती सहन होत नाही म्हणून त्यांच्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करीत असतात नेहमी अशाच प्रकारच्या गुन्ह्यामुळे आमची बदनामी होत आहे.10 रोजी त्यांचे पती फकीरा बेग मिर्झा हे खाजगी कामानिमित्त चाळीसगाव पोलीस स्टेशनला आले होते त्यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव गुन्ह्यात जोडले गेले याप्रकरणाची चौकशी होवुन त्यांचे नाव वगळण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला त्यांच्यासह मौसीम बेग कमालबेग, कलामबेग जमालबेग, अजिज बेग जमालबेग, नर्गीसबी शफीयोद्दीन शेख, शकीलाबी आसीफ शेख, शाहीन बी शेख जावेद, आदील खान उपस्थित होते.