दादरच्या आय.ई.एस.मॉडर्न शाळेत घडताहेत गंभीर गुन्हे

0

मुंबई । मुंबईतील दादरच्या आय.ई.एस. मॉडर्न शाळेत अत्यंत धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.शिक्षकांनी स्वतःच लेखी दिलेल्या पत्रात तसे म्हटले आहे. शाळेत चोरी करणे, शिक्षकांवर थुंकणे, महिला शिक्षकांना थेट व्हॉटस एप वर धमक्या पाठविणे, टॉयलेटमध्ये मार्‍यामार्‍या करणे, अश्‍लील चित्रे काढणे, असे प्रकार विद्यार्थी करत आहेत. तर काही पालकांकडून शाळेच्या विद्यार्थ्यांना धमकाविण्यात येत आहे. असे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार शाळेत घडत असल्याचे शिक्षकांच्या पत्रात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना अपमानीत केल्याची होती मुळ तक्रार
शाळेविरूध्द आणि संस्थेविरूध्द मुळ तक्रार पालकांनी केली होती. विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून पालकांच्यासमक्ष पांढरे कार्ड दाखवून अपमानीत करण्याच्या गैरप्रकार घडत असल्याचे पालकांचे म्हणने होते. तशी तक्रार बाल हक्क आयोगाकडे करण्यात आली होती. फी च्या मुद्यावरून विद्यार्थ्यांना शिक्षा करने अथवा त्यांचा अपमान करने हा गंभीर गुन्हा असल्याचे पालक प्रसाद तुळसकर यांचे म्हमने आहे. जनशक्तीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्याची दखल घेण्याऐवजी शिक्षकांच्याच तक्रारी आयोगासमोर लेखी खुलाशात घेण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.

सरकारच्या धोरणामुळे हे प्रकार
हे सर्व बालकांच्या मोफत हक्क कायद्यातील तरतुदी व बालकांना शिक्षा न करण्याच्या धोरणामुळे झाले असून त्यामुळे शिक्षकांचे पारिवारिक आयुष्यास हानी पोहोचली आहे, असे शिक्षकांचे आणि संस्थेचे म्हणने आहे. शिक्षक त्यांच्या कुटुंबियांच्या सदस्यांशी व्यवस्थित वागत नाहीत कारण त्यांना मानसिक आजार झाले आहेत, असे धक्कादायक विधान लेखी जबाबात करण्यात आले आहे. दरम्रान, रा प्रकारा मुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हे प्रकार अत्रंत गंभीर असून शासनाने राकडे गंभीर दखल घेऊन लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

आमचे गार्‍हाणे वेगळे आहे. शाळेचे म्हणने वेगळे आहे. संबंधित सर्व शिक्षकांचे मानसिक आजार बरे करण्यासाठी काउन्सीलर नेमावेत व ते नीट होईपर्यंत त्यांना निलंबित करावे, अशी मागणी आम्ही बाल हक्क आयोगासमोर केली आहे.
– प्रसाद तुळसकर, पालक