मुंबई । सामनावीर दिनेश साळुंखे याची धडाकेबाज फलंदाजी (29 चेंडूत 66 धावा) आणि खिझार दाफेदार (38/3) व तनुश कोटियन (15/3) या ऑफ स्पिनर्सची अचूक गोलंदाजी यामुळे दादर युनियन संघाने आपल्या पहिल्याच प्रयत्नात प्रबोधन मुंबई टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत त्यांनी गतविजेत्या कर्नाटक स्पोर्टिंग संघावर तब्बल 44 धावांनी दणदणीत विजय मिळविला. कर्नाटक स्पोर्टिंगने नाणेफेक जिंकून दादर युनियन संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र या महत्वपूर्ण लढतीत सलामीला फलंदाजीला उतरलेल्या दिनेश साळुंखेने त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. त्याने हार्दिक तामोरेसह (21 चेंडूत 39) दुसर्या विकेटसाठी केवळ 37 चेंडूत 80 धावांची झंझावाती भागीदारी केली. साळुंखेने त्यात 29 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार ठोकत 66 धावा केल्या. साळुंखे बाद झाल्यानंतर करण मोरे आणि यशस्वी जैस्वाल यांनी देखील तोच कित्ता गिरवत 41 चेंडूत 106 धावांची भागीदारी केल्याने अखेर दादर युनियन संघाने निर्धारित 20 षटकात 7 बाद 273 धावांची मजल मारली.
करण मोरे याने 26 चेंडूत 58 धावा ठोकताना 4 चौकार आणि 5 षटकार मारले तर यशस्वी जैस्वाल याने आपल्या 60 धावांच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्नाटकला ब्रवीष शेट्टी (24 चेंडूत 61) आणि आकर्षित गोमेल (27 चेंडूत 58) यांनी 6.3 षटकात (107) शतकी सलामी दिली. मात्र ही जोडी तंबूत परतल्यानंतर त्यांचे अन्य फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले आणि त्यांचा डाव केव 17 षटकात 227 धावात आटोपला. तनुश कोटियन आणि खिझार दाफेदार या युवा ऑफ स्पिनर्सनी टिच्चून गोलंदाजी करीत दादर युनियन संघाला अंतिम फेरीत नेले. यजमान प्रबोधन संघाने अत्यंत थरारक लढतीत सिंध क्रिकेट क्लबवर केवळ एका विकेत्ने विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली होती. सिंध सी.सी.संघाच्या 4 बाद 212 धावांचा यशस्वी पाठलाग करताना यजमान प्रबोधन संघासाठी सलामीवीर शशांक सिंघ याने शानदार शतक (100) ठोकताना कौस्तुभ पवारच्या साथीने 139 धावांची भागी रचली होती. मात्र, शेवटी कौस्तुभ पवार, सर्वेश दामले आणि योगेश ताकवले लागोपाठ बाद झाल्यानंतर विनीत सिन्हा या अकराव्या क्रमांकावरील फलंदाजाने त्यांना विजयपथावर नेले.
संक्षिप्त धावफलक : दादर युनियन -20 षटकात 7 बाद 273 (दिनेश साळुंखे 66, हार्दिक तामोरे 39, करण मोरे 58, यशस्वी जैस्वाल 60,शिवं दुबे 48/4, ऐश्वर्या सुर्वे 42/3) वि.वि. कर्नाटक स्पोर्टिंग – 17 षटकात सर्वबाद 227 (ब्रवीष शेट्टी 61, आकर्षित गोमेल 58, रौनक शर्मा 24, खिझार दाफेदार 38/3,