मुंबई – सोलापूरातील हेरिटेज येथे आज महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून देशातील सुरक्षेविषयी बोलतांना बोलण्याच्या ओघात चूक झाली. पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देताना, पाकिस्तानने देशातील ४० अतिरेकी मारले, असे वक्तव्य रावसाहेब दानवेंनी आपल्या भाषणात केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने दानवेंचा याबाबतच व्हिडीओ शेअर करुन त्यांच्यावर टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन रावसाहेब दानवेंचा एका व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे, त्यात देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीर जवानांनाच भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी अतिरेकी ठरवले हेच का भाजपचे बेगडी देशप्रेम? असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.