शिरपूर । महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित 16 वर्षे आतील क्रिकेट संघात दानेश प्रितेश पटेल यांची निवड झाली आहे. दानेश पटेल महाराष्ट्र संघाकडून मुंबई, सौराष्ट्र, गुजराथ, बडोदा या संघांविरुद्ध खेळणार आहे. दानेश हा मागील आठ वर्षांपासुन शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे शिरपूर येथे क्रिकेट खेळाचा सराव करीत असून त्याने यापूर्वी तिनदा राज्य स्तरावर व एकदा राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून शिरपूरचा नावलौकीक क्रिकेट क्षेत्रात केला आहे.
दानेश पटेल यांच्या निवडीबद्दल माजी शिक्षणमंत्री व संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, माजी आ. राजवर्धन कदमबांडे, नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपनभाई पटेल, बी.सी.सी.आय. संचालक नवीन शेट्टी, संस्था सचिव प्रभाकरराव चव्हाण, प्रमोद क्षिरे, नाटूसिंग गिरासे, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, सीईओ डॉ.उमेश शर्मा, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक यांनी कौतुक केले. त्यास प्रशिक्षक फिरोज शेख, राकेश बोरसे व संदीप देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.