वार्सा । दापुर ता.साक्री येथे जनसुविधा योजनेतंर्गत निधीतून बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत इमारत व सभागृहाचे उद्घाटन जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी आमदार डी.एस.अहिरे व जिल्हा बॅकेचे संचालक हर्षवर्धन दहिते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या ग्रामपंचायत इमारतीमुळे प्रशासनातील कामे गतीमान करणे शक्य होईल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी जि.प.सदस्य योगेश चौधरी, साक्री पं.स.चे गटनेते उत्पल नांद्रे, सामोडेचे उपसरपंच पंकज दहिते, ठेकेदार सचिन शिंदे , बबलू काकुस्ते, दापूरचे सरपंच भरत अहिरे, उपसरपंच अनिता मालचे, महेश अहिरराव, हेमंत शिंदे, मुन्ना देवरे, बोधगावचे सरपंच चंद्रकांत भोये, आमोडेचे सरपंच सुहास सूर्यवंशी, सरपंच मन्साराम भोये, सरपंच गोरख भोये,गणेश गावित, रोहणचे सरपंच लक्ष्मण बागुल, भीमराव बहिरम ,ईश्वर गायकवाड, नानाजी देवरे,चितामण पवार, विश्वास सोनवणे, काळू मालचे,राजाराम बागूल, यांचे सह अनेक गावांचे सरपंच पदाधिकारी उपस्थित होते.
निधीची खास तरतूद
जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते यांच्याकडे दापूरच्या ग्रामस्थांनी सातत्याने मागणी केली होती. त्याअनुषंगाने अध्यक्ष दहिते यांनी खास तरतूद म्हणून जनसुविधा योजनेतंर्गत ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करून दिला. ग्रामपंचायत इमारत खूप सुदंर बांधली म्हणून समाधान व्यक्त करण्यातआले. यशस्वीतेसाठी सदस्य काळू चौरे,योगेश चौरे, ग्रामसेवक पी.एस.खैरनार आदींनी कामकाज पाहिले.