दाम्पत्याची सोशल मिडीयावर बदनामीप्रकरणी न्यायालयात खटला दाखल

0

भुसावळ- वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी इस्टेट परीसरातील ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियनचे नेते महासचिव सुनील हरीष महाजन व त्यांच्या पत्नी भारती सुनील महाजन यांची सोशल मिडीया तसेच पत्रकाद्वारे बदनामी केल्याप्रकरणी योगेश आत्माराम पाटील (ठाकरे) यांच्याविरुद्ध भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात बदनामी खटला दाखल करण्यात आला आहे. बदनामी प्रकरणी पाच लाखांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.