दारुची अवैध वाहतूक : नंदुरबारच्या संशयीतासह सव्वा लाखांचा मद्यसाठा जप्त

शिरपूर : शहर पोलिसाना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वाघाडी बाळदे रस्त्यावर एका कारवर धडक कारवाई करीत टॅगो पंच दारूची अवैध वाहतूक करणार्‍या कारवर धडक कारवाई करण्यात आली. एक लाख 15 हजार 200 रुपये किंमतीच्या दूर साठ्यासह दोन लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. नंदुरबार येथील संशयीत ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात असून ही कारवाई शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

नंदुरबारच्या संशयीताविरोधात गुन्हा
शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाघाडी मार्गे शिंदखेडा कडे एका चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती शनिवारी दुपारी मिळाली होती.मिळालेल्या माहितीवरून शहर पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने वाघाडी-जातोडा रस्त्यावरील सुमित केमिकल फॅक्टरीलगत सापळा रचण्यात आला. चारचाकी (एम.एच.21 व्ही.1297) क्रमांकाची कार येताच थांबवून तपासणी केली असता तयात एक लाख 15 हजार 200 रुपये कींमतीचे 40 खोके टॅगो पंचचा अवैध दारू साठा आढळून आला. दारुसाठा व कारसह 2 लाख 65 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेत संशयित कार चालक जितेंद्र पुनमचंद सोनिस (43, रा.हुडको कॉलनी, नंदुरबार) यास ताब्यात घेतले.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव शिरपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जी.बी.कुटे यांच्यासह शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.