जळगाव। शहरातील तांबापुरा-फुकटपुरा व पंचशिलनगर या झोपडपट्टी परिसरात घराघरात दारु विक्री होत असल्याचे निवदेन येथील रहिवाश्यांच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क विभागास देण्यात आले आहे. दारु विक्री बंद करुन संबधीतांवर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाश्यांनी केली आहे.
जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील रहिवासी परिसरात सर्रास दारुची विक्री सुरु आहे. या प्रकरणी वेळोवेळी तक्रारी करुनही उपाय योजना होत नाही, तसेच घरा-घरात दारु विक्री होत असल्याने हाणामार्या, भांडणे महिला मुलींच्या छेडखानीचे प्रकार वाढले असुन रहिवासी विकार खान, फिरोज खान, संपत कोळी, रमेश मोची, मुक्तार पटेल, अहेमद खान, हमीद शेख यांच्यावतीने राज्यउत्पादन शुल्क विभाग कार्यालयास रहिवाश्यांच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. रमजान महिना सुरु असल्याने दारु विक्रीमुळे परिसरात तणावाचे वातावरण असुन संबधीतांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.