भुसावळ तालुका पोलिसांची कारवाई : पाच हजारांची देशी दारू जप्त
भुसावळ : कुर्हा ते चोरवड दरम्यान भुसावळ तालुका पोलिसांनी अवैधरीत्या दारूची वाहतूक करणार्या एकास अटक करीत त्याच्या ताब्यातून पाच हजारांची दारू तसेच 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली. सुरज रामदेव परदेशी (24, दोन्ही रा.श्रध्दानगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. एका अल्पवयीन संशयीतासही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी दुचाकी (एम.एच.19 डी.के.7016) वरून दारूची वाहतूक करीत असताना शुक्रवारी रात्री गस्तीदरम्यान पोलिसांना मिळून आल्याने चार हजार 992 रुपये किंमतीची दारू तसेच 40 हजारांची दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, हवालदार विठ्ठल फुसे, हवालदार प्रवीण पाटील, नितीन सपकाळे यांनी केली.