दारूल उलूम देवबंदची स्मार्टफोनवर बंदी

0

सहारणपूर : देशातील महत्त्वाची इस्लामी शिक्षण संस्था असलेल्या दारुल उलूम देवबंदने पत्रक काढून विद्यार्थ्यांना स्मार्टफोन वापरण्यास बंदी केली आहे.

बंदीआदेश मोडणार्‍या विद्यार्थ्यास संस्थेतून काढून टाकले जाणार आहे. देवबंदचे कुलगुरू मौलाना अबुल कासिम नोमानी यांनी या बंदीचे समर्थन करताना म्हटले आहे की, मुलांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांना संस्कारी बनवणे ही आमची जबाबदारी आहे. त्या दृष्टीकोनातूनच आम्ही हे पाऊल उचलले आहे. सिनेमा, क्रिकेट व इंटरनेटवर अनावश्यक साइट पाहणार्‍या मुलांना आम्ही शिक्षण देऊ शकत नाही. कॅमेरा व विविध फिचरवाले फोन वापरणे हा देवबंदमध्ये गुन्हा असेल. मुले साधा फोन स्वत:जवळ बाळगू शकतात. मात्र, त्याचा वापर फावल्या वेळेतच करता येईल. विद्यार्थ्यांनीही देवबंदच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.