जळगाव : तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्यास मारहाण केल्याची घना रेल्वे स्टेशन परीसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दारू पिण्यासाठी दोनशे रुपये देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली.
पैसे न दिल्याने मारहाण
जळगाव शहरातील पांडे चौक परीसरातील ऋषिकेश अनिल मोरे (22) हा तरुण शुक्रवारी रात्री रेल्वे स्टेशन पपरीसरात तंबाखूची पुडी घेण्यासाठी गेला होता. या ठिकाणी त्याला राहुल अर्जुन भगत (रा.केसी पार्क, कानदळा रोड, जळगाव) याने दारू पिण्यासाठी दोनशे रुपये मागितले. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर राहुल भगतने ऋषिकेश याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली तसेच डाव्या बाजूचे चेहर्यावर मारली. या घटनेत ऋषिकेश यास गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी जखमी ऋषिकेशने शनिवारी दिलेल्या तक्रारीवरून राहुल अर्जुन भगत याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार भावराव इंगळे हे करीत आहेत.