भुसावळातील घटना ; आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी
भुसावळ- दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचा दात तोडण्यात आल्याची घटना 13 रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास शहरातील हद्दीवाली चाळ भागात घडली. या प्रकरणी आरोपी बबलू उर्फ उमेश मनीचंद चापरे उर्फ पटेल (34, हद्दीवाली चाळ, लोको शेड, भुसावळ) यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तक्रारदार फारूक अब्दुल शेख कुरेशी (हद्दीवाली चाळ, भुसावळ) यांच्या घरात आरोपी बेकायदा शिरला व त्याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले मात्र कुरेशी यांनी पैसे न दिल्याने आरोपीने लाकडी दांड्याने मारहाण करीत त्यांचे दात तोडले. तपास प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय पाटील करीत आहेत.