जळगाव । तालुक्यातील किनोद फाटयावर सर्रासपणे दारु विक्री सुरु असून करंज येथील तरुणाने दारुविक्रीस विरोध केल्याने दारुविक्रेत्यांनी तरुणास मारहाण केल्याची घटना आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडली. तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.याबाबत जखमी तरुणाच्या कुटुंबिय व नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, करंज गावात दारु बंदीचा ठराव झाला आहे. करंज गावाशेजारील किनोद गावात फाटयावरच सर्रासपणे दारु विक्री केली जाते. त्यामुळे करंज काही तरुण किनोद फाटयावर गेले असता, त्यांनी दारु विक्रीला विरोध केला. यावेळी संदिप जिजाबराव सपकाळे वय 29 याला नारायण सपकाळे, विक्रम बाविस्कर, नगा सपकाळे या तिघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली . या मारहाणीत संदिपच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.