‘दिग्विजय’ची चमकदार कामगिरी

0

पुणे । सदर्न कमांडतर्फे आयोजित सदर्न स्टार हॉर्स शो या स्पर्धेत दिग्विजय हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. श्रीया पुरंदरे, अनिरुद्ध मोहिरे, सोहम फडे, सोफी बेग यांनी विविध प्रकारात आपले कौशल्य दाखवित पदकांची कमाई केली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले. यावेळी दिग्विजय हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमीचे गुणेश पुरंदरे, विनायक हळबे उपस्थित होते.

या स्पर्धेत श्रीया पुरंदरे हीने लेडीज हॅक्स मध्ये सुवर्ण, चिल्ड्रन वन शो जम्पगिंमध्ये रौप्य, चिल्ड्रन वन हॅक्समध्ये कांस्य पदक पटकाविले. तर अनिरुद्ध मोहिरे याने हंटर्स क्लास ओपनमध्ये कांस्य आणि ज्युनियर शो जम्पींगमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. सोहम फडे याने चिल्ड्रन्स शो जम्पिंगमध्ये कांस्य, पोल बेन्डिंगमध्ये रौप्य, हॅक्समध्ये रोझेट, आणि चिल्ड्रन्स राईड फन इव्हेंटमध्ये कांस्य पदक मिळविले. सोफी बेग हीने देखील लेडीज हॅक्समध्ये कांस्य पदक पटकाविले.