दिघीचा घरफोड्या जेरबंद

0

अडीच लाखांचा ऐवज जप्त

पिंपरी-चिंचवड : घरफोड्या करणार्‍या एका आरोपीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून 2 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे तीन पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत. प्रतीक हिराचंद लिडकर (वय 23, रा. आदर्शनगर, बाबासाहेब कराडे चाळीमागे, दिघी) असे घरफाड्याचे नाव आहे.

दागिणे, लॅपटॉप, आयफोन हस्तगत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याचे तपास पथक 10 जून रोजी काळेवाडी परिसरात गस्त घालत असताना माहिती मिळाली की, एक रेकॉर्डवरील गुन्हेगार काळेवाडी येथील आठवण हॉटेल समोर उभा असल्याचे समजले. तपास पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोड्या केल्याचे मान्य केले. त्याच्याकडून 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 3 लॅपटॉप, 1 अ‍ॅप्पल कंपनीचा आयपॅड, 1 अ‍ॅप्पल कंपनीचा आयफोन असा एकूण 2 लाख 60 हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला. यामुळे वाकड पोलीस ठाण्यातील 2, मंचर आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, तपास पथकातील पोलीस कर्मचारी प्रमोद कदम, शाम बाबा, अशोक दुधवणे, विक्रांत गायकवाड, मधुकर चव्हाण, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, नितीन गेंगजे, बिभीषण कण्हेरकर, अनिल महाजन सनी गोंधळे, महंमद नदाफ, धनराज किरनाळे, दादा पवार यांच्या पथकाने केली.