दिघी खाडीमध्ये 1200 नौका आश्रयाला

0

बोर्ली पंचतन (अभय पाटील) । कोकण किनारपट्टीला ओखी चक्रीवादळाचा तडाखा चांगलाच जाणवत असून यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील 4 मच्छीमार नौका वादळाच्या तडाख्यामध्ये सापडल्याने बेपत्ता होत्या परंतु त्या चारही नौका सुरक्षित किनार्‍यावर पोहचल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्‍वास सोडला. भरडखोल येथील विनायक बाळू वाघे यांच्या मालकीची जयलक्ष्मी मच्छीमार नौका अद्यापही बेपत्ता असल्याने त्या बोटीचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे सदर बोटीवर 4 खलाशी असल्याचे भरडखोल ग्रामस्थानी सांगितले. तर दिघी बंदरामध्ये आश्रयासाठी असलेल्या सुमारे 1000 मच्छीमार नौकांच्या निगराणीसाठी बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंदाराचे आरोग्य पथक व तहसील कार्यलयाचे आपत्ती निवारण टीम कार्यरत आहे.

मच्छिमारांची चांगलीच दाणादाण उडाली
अरबी समुद्रात आलेल्या ओखी वादळाच्या संकटामुळे कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांची चांगलीच दाणादाण उडाली असल्याचे दिसत आहे. भरडखोल येथील विनायक बाळू वाघे यांच्या मालकीची जयलक्ष्मी मच्छिमार नौका क्र आय एन पी एम एच 3 एम एम 705 त्यावर काम करीत असलेल्या नारायण रघुवीर, गणेश मांडलेकर, धर्मा गोवारी व प्रल्हाद बिन अशा 4 खलाशी या नौकेत आसल्याची माहिती श्रीवर्धन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिली. 30 नोव्हेंबर रोजी मच्छिमारी नौका चक्रीवादाळामुळे समुद्रात भरकटल्या होत्या.