दिघी, भोसरी, पिंपरीमध्ये घरफोडी

0
दिघी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दिघी, भोसरी आणि पिंपरी ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या तीन घटना घडल्या आहेत. या तीन घरफोड्यामध्ये एकूण एक लाख 11 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेण्यात आला आहे. दिघीतील स्वामी समर्थ क्लिनिक बंद असताना गुरुवारी (दि.22) मध्यरात्री कुलूप-कोयंडा उचकटून अज्ञात चोरटे आत घुसले.
चोरट्यांनी दवाखान्यातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली 70 हजार रुपयांची रोकड आणि महाराष्ट्र बँक, कॉसमॉस बँक, एसबीआय बँकेचे चेक बुक चोरले केले. याप्रकरणी डॉ. सचिन बाळासाहेब पाटील (वय 32, रा. संत गजानन नगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरीतील घरफोडी प्रकरणी मनोज गुलाबराव पाटील (वय 38, रा. शास्त्री चौक, भोसरी) यांनी भोसरी ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुरुवारी (दि.22) पाटील यांचे घर बंद होते. मध्यरात्री चोरट्यांनी बंद दरवाचा कुलूप-कोयंडा उचकटून आत घुसून घरातील किचनमध्ये ठेवलेल्या लाकडी कपाटातील 36 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. पिंपरी, अजमेरा कॉलनीतील घरफोडी प्रकरणी गजेंद्र लक्ष्मण सवाईकर (वय 37. रा. अजमेरा कॉलनी)यांनी पिंपरी ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि.21)सवाईकर यांचे घर बंद होते. सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळेत घर बंद असताना चोरट्यांनी घरात घुसून पाच हजार रुपयांची रोकड चोरुन नेली.