दिड हजार महिलांची शनिवारी स्वच्छतेची शपथ

0
हळदी-कुंकू सोहळ्यात डस्टबीनचे होणार वाटप
भुसावळ :- हळदी-कुंकू कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या आचार-विचारांची देवाण-घेवाण सोबतच सामाजिक बांधिलकी व कर्तव्य म्हणून शनिवारी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या मीना लोणारी यांच्या स्तृत्य उपक्रमाच्या माध्यमातून महात्मा फुले नगरात दुपारी चार वाजता स्वच्छ जागर अभियानातून महिलांना हळदी-कुंकू व डस्टबीन वाटपाचा कार्यक्रम होत आहे.
खासदार रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी दिड हजार महिलांना स्वच्छतेची शपथ देऊन डस्टबीन व इतर वाणांचे वाटप करण्यात येणार आहे. उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात प्रत्येक घराघरांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे.