दिपनगरला बाल शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

0

भुसावळ। दीपनगर वसाहतीमधील 3 ते 12 वयोगटातील मुला – मुलींसाठी उन्हाळी बाल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सामाजिक कार्याची आवड असलेल्या शैला सावंत यांनी पुढाकार घेतला. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वसाहतीमधील मुलांसाठी काहीतरी चांगले करावे, एखादा चांगला उपक्रम घ्यावा, यासाठी बाल शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात मुलांकडून बिना ठिपक्यांची रांगोळी काढणे रंगांची ओळख, रंग भरणे, चित्र काढणे, गोष्टी सांगणे, बालगीते म्हणणे, पेपर पासून नाव, पाकिटे, चिमणी आदी बनविणे अशा छोट्या छोट्या गोष्टी मुलांकडून करून घेण्यात आल्या.

या शिबीरात दीपनगर परिसरातील 72 मुलांनी सहभाग नोंदविला. मुलांची वाढती संख्या बघून वसाहतीमधील गीतांजली पाटील, अर्चना जावरे, प्रतिभा सुरंगे, अनिता पाटील, कविता चौधरी, संगीता मुघल, शुभांगी असलमोल, श्रुती निकम यांनी स्वत: होऊन आपापल्यापरीने मदत केली.’

समारोप प्रसंगी यांची होती उपस्थिती
मुख्य अभियंता माधव कोठुळे, कविता कोठुळे आणि उपमुख्य अभियंता नितिन गगे, शक्तीगड बहुउद्देशीय संस्था सचिव वाय.जी. सिरसाट, जनसंपर्क अधिकारी मोहन सरदार यांच्या उपस्थितीमध्ये शिबिराचा समारोप करण्यात आला. प्रस्तावना शैला सावंत यांनी तर सूत्रसंचालन सिमा कांबळे यांनी केले. आभार सिरसाट यांनी मानले.