नवी दिल्ली । भारताच्या दिया चितळेने ज्युनिअर गटाच्या क्रोएशिया ओपन टेबल टेनिस स्पर्धेत यश मिळवत जागतिक स्पर्धेसाठी आशियाई संघात स्थान मिळवले आहे.
कॅडेट गटातील मुलींच्या एकेरीच्या लढतीत दिया कांस्यपदकाची मानकरी ठरली आहे. या स्पर्धेत दिया ही एकमेव भारतीय खेळाडू होती. कांस्यपदक निश्चित करताना दियाने उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर आणि दुसरे मानाकंन मिळालेल्या जपानच्या सात्सुकी ओडोचा 11-7, 3-11, 11-8, 12-10 असा पराभव केला. त्यानंतर दियाने रशियाच्या एलिझाबेथ अब्रामिअनला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. दयाने पात्रता फेरीतले तिन सामने जिंकून ज्युनिअर मुलींच्या मेन ड्रॉमध्ये स्थान मिळवले होते.