मुंबई : जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’या चित्रपटात सुष्मिता सेनच्या गाजलेल्या ‘दिलबर’ गाण्याचे रिक्रियेट व्हर्जन दाखवले होते. या रिक्रियेट व्हर्जनवर नोरा फतेहीने आपली अदा दाखवली होती. हे गाणे भरपूर हिट झाले. आता याच गाण्यावर टायगर श्रॉफने एक खास डान्स व्हिडिओही तयार केला आहे.
टायगर श्रॉफने हा डान्स व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे. हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.