जळगाव – देशासह राज्यात कोरोना संक्रमणाच्या वेग दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन दिवसापासून कोरोना रुग्ण देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यामुळे नागरिकांच्या मनात नक्कीच ताण निर्माण झाला आहे. मात्र यात दिलासादायक बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यात एकही रूग्णअजून गंभीर नाही.
सोमवारी जळगाव जिल्ह्यात तब्बल 16 नागरीकांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे नागरिकांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र या सर्वांमध्ये एक दिलासादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे जळगाव जिल्ह्यात एकही कोरणा रुग्ण गंभीर नाही.