नवी दिल्ली- जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे आणि बॅंक निर्यातदारांनी अमेरिकन चलनाची विक्री केल्याने आज शुक्रवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत झाला. याशिवाय, इक्विटी मार्केटमध्ये उच्च उघडल्याने रुपयालाही पाठिंबा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरु होती. त्यामुळे महागाईत देखील वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया ७५ रुपयाच्या जवळ पोहोचला होता. मात्र आता रुपया मजबूत होत असून आज ७३.७४ अशी रुपयाची स्थिती आहे.