दिलासा नाहीच : निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Controversial statement about Maratha community : Suspended police inspector Kiran Kumar Bakale’s bail application rejected  जळगाव : जळगाव गुन्हे शाखेचे तत्कालीन निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा जामीन अर्ज जळगाव न्यायालयाने सोमवारी फेटाळला आहे. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बकाले यांच्याविरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती शिवाय जळगावात या प्रकरणी बकाले यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.

जिल्हापेठ पोलिसात दाखल आहे गुन्हा
जळगाव गुन्हे शाखेतील निलंबित कर्मचारी एएसआय अशोक महाजन यांच्याशी फोनवरून संवाद साधताना निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले होते तसेच याबाबतची क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात एलसीबीचे तत्कालीन निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी बकाले यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता मात्र शुक्रवारी न्यायाधीश बी.एस.धीवरे यांनी अर्ज फेटाळला.