दिलीप वळसे-पाटील यांच्या स्वीय सहाय्यकावर प्राणघातक हल्ला !

0

पुणे: माजी विधानसभा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक काळूदास दांगट आणि त्यांच्या पत्नीवर हल्ला झाला आहे. सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास आंबेगावमधील मेंगडेवाडी येथे ही घटना घडली. यामध्ये दांगट जखमी झाले आहेत.

हा हल्ला शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे. रात्री दीडच्या सुमारास दांगट यांना काही लोकांनी घराबाहेर बोलावले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. हा हल्ला खपवून घेतला जाणार नाही असा इशारा वळसे पाटील यांनी दिला आहे. शिवसैनिकांच्या या भ्याड हल्ल्याचा आणि हीन वृत्तीचा आपण निषेध करतो असे दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीटकरुन म्हटले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी काल आंबेगाव येथे मतदान पार पडले. त्यानंतर ही घटना घडल्याने राजकीय वादातून हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.