व्यापारी संकुलांचे शौचालये आणि वैयक्तिक शौचालयांची पाहणी
शहादा – शहरात केंद्राच्या दिल्ली येथील गुणवत्ता नियंत्रण समिती (क्युसीआय) एक सदस्यीय समितीने अचानक शहरातील शाळा, सार्वजनिक शौचालये, व्यापारी संकुलांचे शौचालये आणि वैयक्तिक शौचालयांची पाहणी केली. शहादा शहर ओडीएफ झाले आहे त्यानंतर जुन 2018 मध्ये तपासणी करण्यात आली. त्या तपासणीचा सकारत्माक अहवाल समितीने दिला व पुढच्या टप्पा म्हणून 6 महिन्यांनी पुढील समिती अधानक शहादा शहरात भेट देण्यासाठी आली. गुणवत्ता नियंत्रक क्युसीआय चे सिनिअर असेसर साईनाथ पाडळे इथे पोहचलयावर त्यांना ऑनलाईन मेसेज आला की, निशांत हायस्कुल व ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स कुकडेल, शाळेच्या शौचालयाची तपासणी करा. केंद्राने पारदर्शी तपासणी व्हावी म्हणून श्री. पाडळे यांनी सरकारी वाहन न वापरता रिक्षाने जाणे पसंद केले.
एका भागाची तपासणी केल्यानंतर पुढील भाग कोणता तपासावा याची माहिती ऑनलाईन भ्रमणध्वनीवर मिळत होती निशांत हायस्कुल व ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स कुकडेल, शाळेत तपासणी करुन त्याचे फोटोग्राफ ऑनलाईन सादर केल्यानंतर त्यांना पुन्हा संदेश आला की, व्हालंटरी प्राथमिक महिला मंडळ शाळेची पहाणी करायची आहे. त्यांनी तत्काळ आपला मोर्चा व्हालंटरी प्राथमिक महिला मंडळ शाळेकडे वळवला आणि तेथून कमरशेल मार्केट मधील पापाजी मार्केट, पुरुषोत्तम मार्केट, तपासणी करुन त्याठिकाणा वरुन 500 मिटर अंतरावर असलेले पब्लीक शौचालयाची तपासणी केली असता लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, स्वच्छता बाबीची तपासणी केली तसेच बस स्टन्ड, सार्वजनिक शौचालय, तपासणी केली नंतर गुजर गल्ली, गणेश नगर, सरस्वती कॉलणी वैयक्तीक शौचालय, तपासणी केली पाण्याची सुविधा नळाची सोय बेसिन आदिची पाहणी करुन अनुदान घेतलेल्या लोकांनी शौचालये बांधली गेली की, नाही त्याचा वापर होतो की, नाही आदी बाबी तपासल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.