दिल्लीच्या संघात रबाडा, कमिन्स आल्याने गोलंदाजीची बाजू भक्कम

0

नवी दिल्ली । आयपीएल 10 या मोसमात दिल्ली डेयरडेविल्स संघात कागिसो रबाडा व पैट कमिंस यांचा समोवश संघात झाल्याने दिल्ली संघाची गोलंदाजीची बाजू भक्कम झाली आहे. असे दिल्ली डेयरडेविल्स संघाचा कर्णधार जहीर खान याने पत्रकारांशी बोलतांना सांगितले. दक्षिण अफ्रिकेचा रबाडा व ऑस्ट्रेलियाचा कमिंस संघातील खेळाडू आहे. दिल्ली संघाचा कर्णधार जहिर खान याने आयपीएल-10 या मौसमाची अधिकृत घोषणा केली यावेळी संघ सर्वोत्तम प्रदर्शन करेल असे ही म्हणाला.

दोन्ही खेळाडू विश्‍वातील सर्वोत्तम खेळाडू
दक्षिण अफ्रिकेचा रबाडा व ऑस्ट्रेलियाचा कमिंस हे आमच्या संघात आल्याने गोलंदाजीची बाजू भक्कम झाली असून प्रतिस्पर्धी संघावर आक्रमण करण्यासाठी एक ताकद मिळेल. हे दोन्ही खेळाडू विश्‍वातील सर्वोत्तम खेळाडू आहे. यांच्याशी चर्चा करून व आपले अनुभव वाटणे हेच आयपीएलचे वैशिष्ट आहे. आमच्या जवळ काही युवा खेळाडू आहे. त्याच्यामुळे आमचे काम सुलभ होईल मला कर्णधारपदाचा आनंद घेवू शकले. भारता विरूध्द कसोटी मालिका खेळणारा गोलंदाज व सर्वांना प्रभावित करणारा कमिंस म्हणाला की, दिल्ली डेयरडेविल्स संघाबरोबर जुडणा माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.

8 एप्रिलला होणार सामना
मी भारतात गोलंदाजी करण्यास आवडते. मला आशा आहे की,जहिर, कागिसो व मोहम्मद शमी याच्या सोबत गोलंदाजी करून काहीतरी शिकू शकले. आयपीएलमध्ये प्रथमच खेळणार्‍या रबाडा म्हणाला की, आयपीएल मध्ये सहभागी होणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. लिलावानंतर डेयरडेविल्स बरोबर जुळण्यास उत्सुक होतो.मी 2015 मध्ये भारतीय दौर्‍यात खुप काही शिकलो आहे. येथून शिकून जाणे माझ्यासाठी महत्वाचे आहे. डेयरडेविल्स आयपीएल मध्ये पहिला सामना 8 एप्रिलला बेगळरू मध्ये रॉयल चैलेंजर्स बेगळरू बरोबर होणरा आहे.