नवी दिल्ली- दिल्लीत भाजपतर्फे आज दलित रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये ३००० किलोची खिचडी बनविली जाणार आहे.
रेकॉर्ड बनविण्याच्या उद्देशाने रामलीला मैदानावर दलित समाज बांधवांकडून एकत्र करण्यात आलेल्या तांदूळ आणि डाळीची खिचडी बनविली जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली ‘भीम महासंगम विजय संकल्प’ रॅलीमध्ये भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये खिचडीचे वितरण केले जाणार आहे.
नोव्हेंबर २०१७ मध्ये प्रसिद्ध शेफ संजीव कपूरने ९१८ किलोची खिचडी बनविली होती, खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालयातर्फे ‘वर्ल्ड फूड इंडिया’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यातील हे जागतिक रेकॉर्ड होते.