नवी दिल्ली-राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात थंडीमुळे मोठ्या प्रमाणत धुके पसरले आहे. त्यामुळे वाहतूक सेवेवर मोठा परिणाम होत आहे. आज यामुळे दिल्ली विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहे.
एअरपोर्ट अथॉरिटीने धुक्यांमुळे विपरीत घटना घडू नये याची खबरदारी घेत सर्व उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या दिल्लीचे तापमान २-३ डिग्रीवर जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे अधिकच परिणाम होणार आहे.
हिवाळ्यात राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील तापमान सर्वाधिक कमी असतो.