दिल्ली: दिल्लीतील आपचे उमेदवार राघव चढ्ढा यांनी भाजपवर बोगस मतदानाचे आरोप केले आहे. भाजपचे कार्यकर्त्यांनी ४ ते ५ वेळेस मतदान केले असल्याचे आरोप चढ्ढा यांनी केले आहे. दिल्लीतील संगम विहार मतदान केंद्रावर भाजपचे कार्यकर्ते स्कार्फमध्ये फिरत असल्याचा आरोप केला आहे. आपच्या कार्यकर्त्यांनी एकाला मतदाराला रंगेहात पकडले आहे, असे चढ्ढा यांनी सांगितले. आपच्या कार्यकर्त्यांनी ८-१० लोकांची मतदार ओळखपत्राची तपासणी केली असता, त्यांच्याकडे मतदान कार्ड बोगस असल्याचे निदर्शनास आले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी हे मतदान केंद्रावर फिरत असून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राघव चढ्ढा यांनी केला आहे.