जळगाव । केंद्र शासनाचे प्रशिक्षण केंद्र हैदराबाद येथील एनआयआरडीपीआर यांनी राष्टीय प्रशिक्षक यांची ऑनलाईन यादी जाहीर केली आहे. यात जळगावचे सुनील रामदास वाणी, सागर मुरलीधर धनाड, भूषण दिलीप लाडवंजारी तिघे प्रथम मानांक मिळून उत्तीर्ण झाले आहे. हे तिघे अनेक वर्षांपासून शासनाचे विविध प्रशिक्षणे तसेच विविध शासनाच्या समित्यांवर उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे. नुकतेच जलसंपदा विभागामार्फत जिल्हा जलनायक म्हणून देखील या तिघांनी निवड झाली आहे. या तिघांचे पंचायत राज प्रशिक्षण केंद्र खिरोदा, यशदा पुणे आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी कौतुक करून अभिनंदन केले.
विविध प्रशिक्षणाची जबाबदारी
हा कार्यक्रम केंद्र शासनाच्या हैदराबाद येथील एनआयआरडीपीआर व महाराष्ट्र शासन यशदा पूणे यांचे सुयुक्त विद्यमाने नोव्हेंबर 2017 मध्ये रामभाऊ म्हाळुंगी प्रबोधनी भाईंदर मुंबई येथे राज्यातील मास्टर ट्रेनर यांची परीक्षा घेण्यात आली. यावेळी येथे हेद्राबादच्या अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षकाचे सादरीकरण, लेखी परीक्षा आणि प्रशिक्षणाचा अनुभव या सर्वांचे गुणांक देऊन सहा महिने कालावधी नंतर 4 एप्रिल ला निकाल जाहीर करण्यात आला. एप्रिल 2018 पासून शासन निर्णय नुसार दिल्ली ते गल्ली प्रशिक्षण देण्याचे जबाबदारी ही शासनाचे प्रशिक्षण केंद्रामार्फत परीक्षा उत्तीर्ण प्रशिक्षक हे विविध प्रशिक्षणे देऊ शकेल आणि याना आधारकार्ड मार्फत मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून प्रत्येक राज्यात अश्या प्रकारचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सुरु आहे.