दिवंगत महापौर पवळे यांना अभिवादन

0

पिंपरी : महापालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या स्मृती दिनानिमित्त उपमहापौर शैलजा मोरे यांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस व निगडी चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास नगरसेविका सुमन पवळे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विलास वाबळे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, सुखदेव जाधव, पी.एम.टाले, मारूती मारणे आदी उपस्थित होते.

निगडी चौकात झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम.शिंदे, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे, ज्ञानेश्‍वर चिखले, लाला फुगे, ओंकार पवळे, दत्ता दुवा, प्रदीप पाटील, राजाराम राऊत, माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.