पिंपरी चिंचवड : दिवाळीनिमित्त गावाकडे जाणार्या प्रवाशांची संख्या बघता राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या जादा बसेस सोडण्याची व्यवस्था केली आहे. 1 ते 6 नोव्हेंबर दरम्यान एसटीच्या जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, स्वारगेट बसस्थानकातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यासाठी आरक्षण देखील सुरू करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावरून किंवा मोबाइल अॅपवरून तुम्ही तिकीट बूक करु शकता. विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह राज्यातील इतर भागातील प्रवाशांसाठी एसटीने जादा बसेस सोडल्या आहेत. शिवाजीनगर बसस्थानकातून नाशिक, औरंगाबादसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.
कॅन्टोन्मेंट बोर्ड मैदान (वाकडेवाडी) येथून नागपूर, अकोला, अमरावती, अंबड, अहमदपूर, अंबाजोगाई, बीड, औसा, हिंगोली, जाफराबाद, जालना, लातूर, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, परळी, परभणी, तुळजापूर, वाशीम, यवतमाळ, बुलढाणासह जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.